बेबी योग… प्रेग्नेंसीच्या काळात करिना कपूरने केलं योगासन, शेअर केले फोटो

करिना कपूर लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. प्रेग्नेंसीच्या शेवटच्या दिवसात देखील ती स्वत:ची भरपूर काळजी घेत आहे. डाएटसोबत वर्कआउट, एक्सरसाइज आणि योगासन देखील करत आहे. प्रेग्नेंसीच्या काळात योग करतानाचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.

एका प्रमोशनल फोटोशूटवेळी तिने योगा पोज दिल्या आहेत. यामध्ये करिना ब्लॅक वर्कआउट आउटफ‍िट मध्ये वेगवेगळी योगासन करताना दिसत आहे.

kareena

यावेळी करिनाने पिंक वर्कआउट आउटफिट मध्ये देखील आपले फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये करिना योगाशिवाय बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

तिच्या फोटोंमध्ये चेहऱ्यावर ‘प्रेग्नेंसी ग्लो’ स्पष्ट दिसत आहे. या फोटोसह तिने योगासन करतानाचा व्हिडीओ देखील तिने शेअर केला आहे. करिना आपल्या फिटनेसबाबत नेहमी दक्ष असते. वर्कआउटचे फोटो ती बऱ्याचदा सोशल मीडियावर शेअर करते.

kareena2

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सैफ आणि करिनाने ‘सेकंड बेबी’ची घोषणा केली होती. याआधी सैफ आणि करिनाला तैमूर नावाचा मुलगा आहे. ‘तैमूर’ हा सेलिब्रिटी बेबी ठरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या