Photo – पुस्तकाच्या नावावरून वाद, करीना कपूरच्या विरोधात ख्रिस्ती समाजाची तक्रार

अभिनेत्री करीना कपूर-खान हिच्यावर ख्रिस्ती समाज संतापला आहे

ख्रिश्चन सोसायटी या संस्थेने करीनाच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे

ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्याचा करीना कपूरवर आरोप आहे

करीनाने एक पुस्तक लिहिलं आहे, या पुस्तकाचं नाव तिने ‘प्रेग्नंसी बायबल’ असं ठेवलं आहे

ख्रिश्चनांच्या धर्मग्रंथाचा करीनाने अवमान केल्याचा ख्रिस्ती समाजाने आरोप केला आहे

या प्रकरणी ख्रिस्ती समाजाने मध्य प्रदेशातील ओमती पोलीस ठाण्यात करीनाविरोधात तक्रार नोंदवली आहे

बीडमध्येही दाखल केली लेखी तक्रार

करिना कपूरने नुकतेच तिचे एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. ज्यात तिनं दोन्ही मुलांच्या प्रेग्नन्सीच्या वेळचे तिचे अनुभव आणि माहिती दिली आहे. या पुस्तकाला तिने ‘प्रेग्नेन्सी बायबल’ असे नाव दिले आहे. तिच्या या पुस्तकाच्या नावामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या असून बीड मधील एका ग्रुपने करिनाविरोधात पोलिसात लेखी तक्रार दिली आहे.

अल्फ ओमेगा ख्रिश्चन महासंघाने बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात करिना कपूर व आणखी दोघांविरोधात तक्रार दाखल केली. संघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी ही लेखी तक्रार दाखल केली. पुस्तकाच्या शिर्षकामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.संघाकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली असली तरी अद्याप एफआयआर दाखल झालेली नाही.

करीना कपूरनं 2016 साली पहिला मुलगा तैमुरला जन्म दिला. त्यानंतर 2021मध्ये ती पुन्हा एकदा आई झाली आहे.
धाकटय़ा मुलाचे नाव सैफ आणि करिनाने गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र एका वृत्तवाहिनीशी बोलताना करिनाच्या लहान बाळाचं नाव ‘जेह’ असल्याचं आजोबा रणधीर कपूर यांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या