मातृदिनी करिना कपूरचे चाहत्यांना अनोखे ‘गिफ्ट’, छोट्या राजकुमाराचा पहिला फोटो केला शेअर

मातृदिनी अभिनेत्री करिना कपूर-खान हिने चाहत्यांना अनोखे गिफ्ट दिले आहे. करिनाने आपल्या छोट्या राजकुमाराचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तैमूरसोबत हा फोटो शेअर करण्यात आला असून चाहत्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.

करिना कपूर-खान हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. ‘आज आशेवर जग कायम आहे… आणि हे दोघे माझी आशा जागवतात… चांगल्या भविष्यासाठी… मातृदिनाच्या सर्व सुंदर आणि कणखर आयांना शुभेच्छा’, असे कॅप्शन करिना कपूर-खान हिने या फोटोसोबत दिले आहे. फोटोमध्ये करिना आणि सैफचा मोठा मुलगा तैमूर याच्या हातामध्ये छोटा राजकुमार दिसत आहे.

लाखो लाईक्स

करिनाने हा फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी लाईक्स, कमेंटचा पाऊस पाडला आहे. आतापर्यंत 3 लाख 50 हजारांहून अधिक लाईक्स या फोटोवर आले आहेत. यावरून तिचे चाहते या पोस्टची किती आतुरतेने वाट पहात होते हे दिसते.

21 फेब्रुवारीला दिला जन्म

दरम्यान, करिना कपूर-खान आणि सैफ अली खान 21 फेब्रुवारीला दुसऱ्या मुलाचे आई-बाबा झाले. मुलाच्या जन्मानंतर सैफने सोशल मीडियावर पोस्ट करून ही खुशखबर चाहत्यांना दिली होती. तसेच बाळ आणि बाळंतीण दोघांची प्रकृती उत्तम असल्याचे म्हटले होते.

नामकरण विधीकडे लक्ष

कपूर कुटुंब आणि खान कुटुंब छोट्या राजकुमाराच्या जन्मामुळे आनंदी आहे. मात्र अद्याप त्याचा नामकरण विधा झालेला नाही. याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण पहिल्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्याने करिना आणि सैफ यांच्यावर टीकाही करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या