सनी लिओनी पॉर्न स्टार कशी बनली? बायोपिकचा टीझर प्रदर्शित

377

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा चांगलाच बोलबाला आहे. नुकताच संजय दत्तवरील बायोपिक बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून या चित्रपटाने तीन दिवसात तब्बल १२० कोटींचा कमाई केली आहे. आता आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीवर बायोपिक येणार असून याचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीचे संपूर्ण आयुष्य प्रेक्षकांना लवकरच मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. सनीच्या आयुष्यावर आधारीत ‘करणजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट येत असून या चित्रपटाचा टीझर सनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. टीझरमध्ये सनी लिओनीचे लहानपणीपासून ते बॉलिवूडमध्ये येईपर्यंतचे फोटो दिसत आहेत. पंजाबी मुलगी करणजीत कौर ते एक पॉर्न स्टार हा सनी लिओनीचा संपूर्ण प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे.

सनीने चित्रपटाचा टीझर शेअर करताना लिहिले आहे की, ‘लवकरच माझे संपूर्ण आयुष्य एका खुल्या पुस्तकाप्रमाणे तुमच्यासमोर येणार आहे. करणजीत ते सनी लिओनीपर्यंतचा माझा प्रवास. १६ जुलै, २०१८ ला प्रिमिअर आहे’. सनीच्या या टीझरला सोशल मीडियावर चांगलाच पाठिांबा मिळाला असून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या