’कारखानीसांची वारी’ टोकियो तर ’बीटरस्वीट’ बुसान महोत्सवासाठी सज्ज!

कोरोनामुळे थिएटर बंद असले तरी मराठी चित्रपटांची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. मराठमोळा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याच्या ’द डिसायपल’ चित्रपटाने व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवल्यानंतर आता ‘कारखानीसांची वारी’ आणि ’बीटरस्वीट’ हे चित्रपटही परदेशात मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मंगेश जोशी दिग्दर्शित ‘कारखानीसांची वारी’ या चित्रपटाची टोकियो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली असून 31 ऑक्टोबरला आणि 2 नोव्हेंबरला या चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. टोकियो चित्रपट महोत्सव 31 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. ‘ऑडियन्स चॉईस’ अंतर्गत ‘कारखानीसांची वारी’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. एकत्र राहणा-या कारखानीस पुटुंबियांची गोष्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटात अमेय वाघ, डॉ. मोहन आगाशे, गीतांजली पुलकर्णी, प्रदीप जोशी, वंदना गुप्ते, शुभांगी गोखले आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. यापूर्वी मंगेश जोशी यांचा ‘लेथ जोशी’ हा चित्रपट 22 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत झळकला होता.

आपली प्रतिक्रिया द्या