कर्नाटकता येदियुरप्पा सरकार तरलं, पोटनिवडणुकीत भाजपला मोठा विजय

2939
yeddyurappa

कर्नाटकातील बी. एस. येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत कायम राहणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. सोमवारी पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपनं चांगली कामगिरी करत आतापर्यंत 15 पैकी 6 जागांवर विजय मिळवला आहे. तर 6 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस-जेडीएसला तीन जागांवर आघाडी मिळवता आला आहे.

काँग्रेस आणि जेडीएसच्या 17 आमदारांच्या बंडखोरीमुळे भाजपने सत्तेचे स्वप्न पूर्ण केले होते. आता 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर या सत्तेचे भवितव्य ठरणार होते. त्यासाठी भाजप म्हणजेच येदियुरप्पा सरकाराने कंबरकसली होती. अखेर भाजपला पोटनिवडणुकीत मोठं यश मिळाणार असंच चित्र स्पष्ट झालं आहे.

कर्नाटकच्या विजयनगर मतदारसंघातून भाजपच्या आनंद सिंह हे विजयी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या