कर्नाटकमधील विश्वासदर्शक ठरावात ‘या’ नेत्याची ठरणार निर्णायक भूमिका

42

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटक विधानसभेत शनिवारी काय होणार याकडे देशाचं लक्ष लागलंय. सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी चार वाजेपर्यंत येडियुरप्पा सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. विश्वादर्शक ठरावासाठी राज्यपालांनी हंगामी सभापतींची नियुक्ती केली आहे.

राज्यपाल वजुभाई वाला यांनी हंगामी सभापती म्हणून भाजप आमदार के.जी. बोपय्या यांची नियुक्ती केलीय. हंगामी सभापतीपदासाठी काँग्रेस आमदार आर.व्ही. देशपांडे आणि भाजप आमदार उमेश कट्टी यांची नावं चर्चेत होती.

काँग्रेसने बोपय्या यांना हंगामी सभापती करण्यास विरोध केला आहे. ‘सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नेत्याची हंगामी सभापती म्हणून निवड केली जाते’. भाजपने हा नियम मोडलाय असा आरोप काँग्रेस नेते अभिषेक मनू संघवी यांनी केला आहे.

भाजपचे कर्नाटक प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी या टीकेला उत्तर दिलंय. बोपय्या यांना २००८ सालीही हंगामी सभापती म्हणून नियुक्त केले होते. त्यावेळी त्यांचे वय आजच्यापेक्षा १० वर्ष कमी होते याची आठवण जावडेकर यांनी करुन दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या