प्रबोधन मुंबई टी-२० क्रिकेट, कर्नाटकने निर्विवादपणे जिंकले विजेतेपद

23

सामना ऑनलाईन, मुंबई

सलमान अहमद (८५) आणि विनायक भोईर (७२) यांच्या फटकेबाजीच्या बळावर पय्याडे स्पोर्ट्सला थोड्याथोडक्या नव्हे तर ६० धावांनी पराभूत करत कर्नाटक स्पोर्टिंगने १०व्या प्रबोधन मुंबई टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

कर्णधार कौस्तुभ पवार आणि एकनाथ केरकर हे महत्त्वाचे मोहरे चौथ्या षटकांदरम्यान ३२ धावांवर गमावल्यानंतर कर्नाटकने स्वतःला सावरले व ८ बाद २३९ अशी चांगलीच आव्हानात्मक धावसंख्या रचण्यात यश मिळवले. याचे श्रेय सलमान आणि विनायकला जाते हे निश्चित. पण त्यानंतर आपल्या प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यासाठी कौस्तुभने जी व्यूहरचना लावली व त्याबरहुकूम अचूक मारा आपल्या गोलंदाजांकडून करून घेतला यालाही दाद देणे गरजेचे आहे.

कौस्तुभने संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे आपल्या संघाचे नेतृत्व केले त्याची दखलही योग्य प्रकारे घेतली गेली. त्याला स्पर्धेतील ‘सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून गौरविण्यात आले. सलमान सामनावीर ठरला. शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत बाळ सुब्रमण्यम आणि हरीश पंडया यांनी सुरेख समालोचन केले.

आपली प्रतिक्रिया द्या