खवय्यांनो सावध व्हा! FSSAI ने सांगितलं केक ठरू शकतो कर्करोगाचं कारण? वाचा सविस्तर…

वाढदिवस असो वा सेलिब्रेशन केक तो बनता है. मात्र या केकवर जिवापाड प्रेम करणाऱ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी आहे. त्यामुळे केक जास्त खात असाल तर आताच सावध व्हा. कारण केकमुळेही कॅन्सरसारखा घातक आजार होऊ शकतो. कर्नाटक फूड सेफ्टी डिपार्टमेण्टने एक दोन नव्हे तर 12 प्रकारचे केक कॅन्सरचे कारण मानले आहे.

FSSAI ने तपासणीत केकचे 235 नमुने आहेत. ज्यामध्ये 12 केकमध्ये घातक घटक असलेले रंग सापडले आहेत. या केकमध्ये रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट केकचाही समावेश आहे. जे लोकांना भरपूर आवडतात. या केकमध्ये असलेले घातक केमिकल शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहेत.

केकमध्ये वापरण्यात येणारे आर्टिफिशल फूड डाय अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात. FSSAI ने या केक डायला कर्करोगाचे कारण मानले आहे. खरंतर, खाण्यामध्ये आर्टिफिशल फूड डाय पूर्वीपासून वापरले जाते. पहिला सिंथेटिक रंग 1856 मध्ये कोळशाच्या डांबरापासून बनवला गेला. आज हा रंग प्रामुख्याने पेट्रोलियमपासून मिळतो. तर गेल्या काही वर्षांत तयार होत असलेल्या बहुतांश आर्टिफिशल फूड डायमध्ये विषारी घटक असतात जे कर्करोगाचे कारण ठरू शकतात.

Environmental Health Perspectives मध्ये एका संशोधनात सांगण्यात आले आहे की, सनसेट यलो आणि तीन प्रकारच्या कॉमन डायचा वापर केल्याने अस्थमाच्या रुग्णांच्या त्वचेला सूज आणि श्वास घेण्यास अडथळ्यासह अनेक त्रास वाढतात. अस्थमा रुग्णांमध्ये या रंगांनी अॅलर्जी होण्याची संभावना 52 टक्के अधिक असते. अहवालानुसार, कृत्रिम रंगांच्या भेसळीमुळे अतिसार, मळमळ, डोळ्यांच्या समस्या, यकृताचे विकार आणि अगदी कर्करोगासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.