करणी सेनेचा पुन्हा भन्साळींना दणका, कोल्हापूरजवळच्या सेटवर जाळपोळ आणि तोडफोड

41

सामना ऑनलाईन,कोल्हापूर

संजय लीला भन्साळींच्या पद्मावती या चित्रपटाच्या शूटींगसाठी उभारण्यात आलेल्या सेटला पहाटे २-३ च्या सुमारास ३०-४० जणांनी आग लावली. इथे चित्रीकरणासाठी आणलेल्या गाड्या, जनरेटर व्हॅन यांची देखील तोडफोड करण्यात आली. खासकरून कपडेपटाला देखील आग लावण्यात आली. ज्यामुळे १ हजार ऐतिहासिक व्यक्तिरेखांसाठीचे कपडे जळून खाक झाले आहेत. करणी सेनेने ही जाळपोळ आणि तोडफोड त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केल्याचं म्हटलं आहे.

padmavati-set-in-kolhapur-2

कोल्हापूरजवळच्या ऐतिहासिक पन्हाळगडाजवळच्या मसाई पठारावर हे चित्रीकरण करण्यात येत होतं. भन्साली याच्या या चित्रपटाला चित्रीकरणाच्या सुरुवातीपासून विरोध होतोय. कारण त्याने या चित्रपटातून इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. राजपूत राणी पद्मावती ही वीर योद्धा होती. खिलजीच्या हाती लागण्यापेक्षा आपली अब्रू वाचवण्यासाठी राणी पद्मावतीने सोळा हजार महिलांसह अग्निसमर्पण (जोहार) केले. असे कर्तृत्व असताना या महान राणीचे आणि अल्लाउद्दीन खिलजीचे प्रेमसंबंध दाखवणे म्हणजे राणीच्या शौर्याचा आणि त्यागाचा अपमान आहे. त्यामुळे राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रीकरण करणाऱ्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना जयपूरमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप देत चित्रिकरण उधळून लावले होते.

bhansali-protest-1

संजय लीला भन्साळी आपल्या चित्रपटातून राणी पद्मावतीची बदनामी करीत आहे. ही गोष्ट समाजासाठी, देशासाठी घातक आहे. हा हिंदू धर्माचा अपमान आहे. त्यामुळे बदनामी होणारे चित्रीकरण जगात कुठेही केले तरी बंद पाडू, असा इशारा यापूर्वीच राजपूत करणी सेनेने दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या