…तर दीपिकाची शुर्पणखा करू; करणी सेनेचा इशारा

39
सामना ऑनलाईन । मुंबई
‘पद्मावती’ सिनेमा प्रदर्शित झाल्यास दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचं शिरच्छेद करण्याचा तर दीपिका पदुकोणचं नाक कापण्याचा इशारा करणी सेनेनं दिला आहे. तसेच सिनेमागृह जाळून टाकू असंही करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठणकावलं आहे. यामुळे ‘पद्मावती’वरून सुरू झालेला वाद चांगलाच पेटला असून सरकार आणि सिनेमाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
संजय लीला भन्साळी यांचा वादात सापडलेला सिनेमा ‘पद्मावती’तून इतिहासाशी छेडछाड करण्यात आली असून त्यामुळे सामाजिक भावना दुखावल्या असल्याने सिनेमावर बंदी आणावी, अशी करणी सेनेची मागणी आहे. करणी सेनेने येत्या १ डिसेंबरला देशभर बंदचं आवाहन केलं आहे. याच दिवशी पद्मावती सिनेमा रिलीज होणार आहे.
करणी सेनेच्या विरोधानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणने म्हटलं होतं की, सिनेमा रिलीज होणारच आणि सिनेमाला रिलीज होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. दीपिका पदुकोणने केलेलं हे वक्तव्य चिथावणीखोर आहे. तिचं वक्तव्य आव्हान म्हणून आम्ही स्वीकारलं असल्याचं करणी सेनेचे नेता लोकेंद्र सिंह कल्वी यांनी म्हटलं आहे. म्हणूनचं करणी सेनेनं देशव्यापी बंदची हाक दिली आहे. तसेच ज्या थिएटरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल ते थिएटर जाळून टाकण्यात येईल, अशा इशारा करणी सेनेनं दिली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या