करुण नायरचा भीम पराक्रम, तिसऱ्या कसोटीत ठोकलं त्रिशतक

62

सामना ऑनलाईन । चेन्नई

हिंदुस्थानच्या संघाला धावांची गरज असताना संयमी खेळी करत करुण नायरने द्विशतक ठोकलं आणि त्यानंतर धडाकेबाज खेळ करत त्रिशतक ठोकलं. तिसऱ्याच कसोटीत त्याने त्रिशतक ठोकून त्याने नवा विक्रम केला. त्याच्या या तुफानी खेळीने हिंदुस्थानने मोठी धावसंख्या उभी केली.

करुण नायर २५ वर्षाचा तरुण तडफदार फलंदाज. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही त्याची तिसरीच कसोटी. पण या अल्प अनुभवात देखील त्याने मोठी जिगरबाज खेळी करत पहिले शतक, मग द्विशतक आणि पाहता पाहता त्रिशतक ठोकलं. हा त्याचा भीम पराक्रमच म्हटला पाहिजे. अनुभवी फलंदाज बाद झाल्यानंतर देखील अतिशय शांत लयबद्ध फलंदाजी करत, योग्य फटके मारत ३२ चौकार आणि चार षटकारासह त्यानं त्रिशतक साजरं केलं. ३०० धावा करणारा तो जगातील सहावा आणि हिंदुस्थानातील दुसरा खेळाडू ठरला आहे.  या आधी हिंदुस्थानकडून खेळताना वीरेंद्र सेहवागने ३०० धावा केल्या होत्या. ‘करुण, त्रिशतकी खेळी करणाऱ्यांच्या गटात तुझं स्वागत’, अशा शब्दात वीरेंद्र सेहवागने त्याला शुभेच्छा दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या