काशी महाकाल एक्स्प्रेसमध्ये एक जागा भगवान शंकरासाठी राखीव

511

वाराणसीहून इंदोरसाठी रविवारपासून काशी महाकाल एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. या एक्स्प्रेसमध्ये भगवान महादेवांसाठी एक आसन कायमचे आरक्षित ठेवण्यात आले असून त्या जागेला देव्हाऱ्यासारखे रुप देण्यात आले आहे. त्यावरून आता राजकरण चांगलेच तापले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

ओवेसींनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदुस्थानी राज्यघटनेच्या प्रस्तावनेची आठवण करून दिली आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे एक्स्प्रेसमधील सीटचे मंदिरात रूपांतरण करण्यात तीव्र आक्षेप नोंदवला आहे

बी-5 बोगीचे आसन क्रमांक 65 महादेवांसाठी राखीव

रविवारी सांयकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी वाराणसीहून इंदोरसाठी जाणाऱ्या काशी महाकाल एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन 20 फेब्रुवारीपासून नियमित सुरू होत आहे. पण, या एक्स्प्रेसमधील बी-5 बोगीतील आसन क्रमांक 64 वर भगवान शंकराचे छोटे मंदिर उभारण्यात आले आहे. या आसनाला हुबेहूब देव्हाऱ्याचे रूप देण्यात आलं आहे.बी-5 मधील 64 क्रमांकाचे आसन कायमस्वरूपी महादेवांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचे रेल्वेच्या आधिकाऱ्यानं सांगितलं आहे. त्यामुळे सध्या उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या