कश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी

19

सामना प्रतिनिधी । वॉशिंग्टन

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील वादग्रस्त कश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मी मध्यस्थी करायला तयार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी ट्रम्प यांनी कश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माझी मदत मागितली होती. त्यामुळे मला हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करायला आवडेल असे सांगितले.

हिंदुस्थान मध्यस्थीविरोधात

यापूर्वी पाकिस्तानने अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, हिंदुस्थानने हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत कोणत्याही तिसर्‍या देशाला यामध्ये हस्तक्षेप करू देण्यास ठाम नकार दिला होता. जन्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी हिंदुस्थानच्या भूमिकेत खरंच बदल झालाय का, असा प्रश्न ट्विटरवरून केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या