कश्मीर हाताबाहेर… विद्यार्थिनींची लष्करावर दगडफेक

50

सामना ऑनलाईन, श्रीनगर

काश्मीर खोऱयातील परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असून, दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज श्रीनगरात शाळा-कॉलेजच्या माथेफिरू विद्यार्थ्यांनी लष्करी जवानांवर दगडफेक केली. धक्कादायक म्हणजे दगडफेक करणाऱयांमध्ये विद्यार्थिनी पुढे होत्या.

चार दिवसांपूर्वी दक्षिण काश्मिरात शोपियॉ आणि अनंतनाग जिह्यात लष्करी जवानांनी धडक कारवाई करीत काही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यामुळे देशद्रोही फुटीरवाद्यांनी  काश्मीर खोऱयात बंद पुकारला होता. आज या तणावात आणखी भर पडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून काश्मीर खोऱयातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी रस्त्यावर उतरून दगडफेक करीत आहेत. त्यामुळे काही दिवस शाळा-कॉलेज बंद ठेवले होते.

दगडफेकीमुळे अपघात; दोन जवान शहीद

बुधवारी अनंतनाग जिह्यात माथेफिरू तरुणांनी केलेल्या दगडफेकीत सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले. दोन जवान  मोटारसायकलवरून सीआरपीएफच्या तळावर जात होते. त्यावेळी जमावाने दगडफेक केल्यामुळे मोटारसायकलवरचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने धडक दिली. त्यात दोन जवान शहीद झाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या