झोका…

86

संग्राम चौगुले, [email protected]

केटलबेल. संपूर्ण शरीराला व्यायाम देणारा व्यायाम प्रकार… पोटाचे स्नायू, पाठीचे आणि कमरेचे स्नायू यामध्ये वापरले जातात….

कॅटलबेल हा व्यायाम प्रकार आता काही वर्षांपासून जास्त केला जातो. कारण यामध्ये कंपाऊंड मुव्हमेंटचा वापर जास्त होतो आणि मसल्स ग्रुपचा वापर होतो. जे व्यायाम प्रकार मशीनवर करतात त्यामध्ये आयसोलेशन मुव्हमेंट जास्त होतात. त्यामुळे कंपाऊंड मुव्हमेंटच्या तुलनेत कॅलरी बर्निंग कमी होते. कॅटलबेल म्हणजे एक लोखंडी गोळा असतो. त्याला एक हॅण्डल असते. त्याला पकडून व्यायाम केला जातो. यामध्ये बहुतांश स्विंगिंगच्या मुव्हमेंट्स होतात. पण शक्तीपेक्षा फॉर्म आणि टेक्निकचा वापर जास्त होतो. पोटाचे, पायाचे, पाठीचे आणि काही प्रमाणात हातांचेही स्नायू बळकट होण्यासाठी कॅटलबेल हा व्यायाम प्रकार केला जातो. या व्यायाम प्रकारामुळे संपूर्ण शरीराला व्यायाम होतो असं म्हटलं तरी चालेल. हा अलिकडेच आलेला व्यायाम प्रकार आहे. याचे मूळ रशियात सापडते. रशियन सैनिकांसाठी हा व्यायाम प्रकार शोधला गेला.

कॅटलबेलचा व्यायाम करत असताना दोन्ही पायांमधील अंतर हे खांद्यांच्या अंतरापेक्षा जास्त असते. या स्थितीमध्ये डेड लिफ्ट ग्लट्स स्क्वाट्स याचा व्यायाम होतो. यामध्ये एकत्रित व्यायाम म्हणजेच मल्टी मसल्सचा व्यायाम होतो. म्हणून इतर व्यायाम प्रकाराच्या एका सत्रात होणाऱया कॅलरीज बर्निंगपेक्षा याच्या एका सत्रामध्ये जास्त कॅलरीज बर्न होतात.

कॅटलबेल या व्यायाम प्रकाराचेही अनेक उपप्रकार आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखेरीज घरच्या घरी हा व्यायाम प्रकार कधीही करू नये. ५ किलोपासून ते १५-२० किलोपर्यंत वजनाची कॅटलबेल असू शकतात. आपापल्या क्षमतेनुसार योग्य कॅटलबेलची निवड करायची असते. पण संपूर्ण शरीराला या व्यायाम प्रकाराचा अत्यंत फायदा होतो. कॅटलबेलच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा अनेक स्पर्धाही आयोजित केल्या जातात. जास्तीतजास्त ताकदवान स्पर्धकच या स्पर्धा जिंकतो. कॅटलबेल हे वेगवेगळ्या वजनाचे असतात. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार ते निवडले जातात. पण या व्यायाम प्रकारात कार्यक्षमता, शक्ती आणि टेक्निक या सगळ्याचा वापर होत असतो.

झोका तत्त्व महत्त्वाचे

या व्यायाम प्रकारात शरीराला दिला जाणारा झोका हे तत्त्व सर्वात महत्त्वाचे आहे. जर आपण हातात पाण्याने पूर्ण भरलेली बालदी एका लयीत आणि वेगाने झोका देऊन फिरवायला लागलो तर त्यामधून पाण्याचा एक थेंबही खाली सांडत नाही. तेच तंत्र कॅटलबेल या व्यायाम प्रकारात वापरलं जातं. लोखंडाचा तो गोळा स्पॉट पोझिशनमध्ये केवळ एका हाताने उचलायचा आहे आणि झोका देण्यासाठी तुमची कंबर आणि कंबरेपासूनचा खालचा भाग या स्नायूंचा वापर करायचा आहे. तो कॅटलबेल अत्यंत वेगाने वर आणायचा आहे. आणि पुन्हा त्याच वेगाने तो खाली आणायचा आहे. हाताचा वापर फक्त कॅटलबेल पकडण्यासाठी आहे. ते वजन आपल्याला पाठीच्या, पायाच्या आणि कंबरेच्या स्नायूंनी वाहून न्यायचे आहे. सगळा जोर आहे तो या तीन स्नायूंच्या बळावर चालणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या