कतरिनाला शुभेच्छा देताना सलमानने ‘तो’ खास फोटो पोस्ट केला

बॉलिवूड मधील अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस. या निमित्ताने चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सेलिब्रिटी देखील सोशल मीडियावरून शुभेच्छांचा देत आहेत. वरुण धवन, आलिया भट, अनुष्का शर्मा, यांनी तिला शुभेच्छा दिल्या. मात्र सगळ्यात खास शुभेच्छा आहेत या अभिनेता सलमान खान यांच्या.

सलमान खान आणि कतरिना यांची पडद्यावरची केमिस्ट्री चांगलीच हिट आहे. ही जोडी असली की चाहते सिनेमा आवर्जून पाहायला जातात. सलमान खान आणि कतरिना यांची मैत्रीही चर्चेत राहिली आहे. त्यामुळे कतरिनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान काय पोस्ट करणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. सलमानने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक फोटो पोस्ट केला आहे. ‘टायगर जिंदा है’ मधील एका दृश्यात दोघे बोलतानाचे ते खास क्षण आहेत. या फोटो सोबत ‘Happy bday Katrina’ असे म्हणत त्याने शुभेच्छा दिल्या आहेत.

salman-khan-katrina

आपली प्रतिक्रिया द्या