कतरिनाचं लग्न ठरल ? नववधूच्या वेशातला फोटो इंटरनेटवर व्हायरल

1080

अभिनेता विकी कौशलसोबत अफेअर असल्याने सध्या अभिनेत्री कतरिना कैफ खूपच चर्चेत आहे. त्यातच कतरिनाचा नववधू वेशातील फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिचं लग्न ठरल्याची चर्चा रंगू लागली आहे.

कतरिना आणि विकी कौशलच्या अफेअरच्या चर्चेला सध्या इंटरनेटवर उधाण आले आहे. मात्र दोघांनी आपल्या अफेअरचा अद्याप सर्वांसमोर खुलासा केलेला नाही. कतरिना आणि विकी कौशल दोघेही अनेक पार्टींमध्ये एकत्र दिसतात. अलीकडेच दोघे त्यांचा एका मित्राच्या पार्टीत एकत्र दिसले, त्यानंतर त्यांचा चाहत्यांनी ट्विटरवर त्या दोघांना ‘पॉवर कपल’ संबोधण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी एक टोपणनावही दिले आहे. चाहत्यांनी विकी आणि कतरिनाला ‘VicKat’ हे टोपणनाव दिले आहे.

katrina-bridal-look

अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती स्वत:चे फोटो आणि व्हिडिओही शेअर करत असते. त्यामुळे निश्चितच चाहत्यांनी कमेंट केलेले टोपणनाव पाहिले असणार. मात्र तरीही दोघांनी आपल्या नात्याची अधिकृतरित्या जाहीर कबुली दिली नाही.

अभिनेत्री कतरिना झाली नववधू?
कतरिनाचा एका जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यानचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत अभिनेत्री कतरिना नववधूच्या वेशात दिसत आहे. या वेशातील काही फोटो कतरिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही शेअर केले आहे. तसेच या फोटोत कतरिना सेटवर पत्ते खेळतानाही दिसत आहे. त्याबरोबर फोटोत कतरिना स्मित हास्य करताना सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री कतरिना लवकरच अक्षय कुमारबरोबर ‘सूर्यवंशी’ सिनेमात दिसणार आहे. तसेच अभिनेता विकी कौशलचे या वर्षात अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यात ‘भूत-पार्ट 1: द हॉन्टेड शिप’, ‘सरदार ऊधम सिंह’ आणि फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचा बायोपिकचा सामावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या