हॉलीवूड सिंगर केटी पेरीकडून इन्स्टाग्रामवर हिंदू देवतांच्या फोटोची विटंबना

26
सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार केटी पेरी हिने आपण रागावलो आहोत हे सांगण्यासाठी इन्स्टाग्रामवर काली मातेचा फोटो पोस्ट केला आहे. केटीची ही कृती अनेकांना आवडली नाही. हिंदूंसाठी काली माता ही वाईटाचा, असूरांचा विनाश करणारी देवी आहे. देवीच्या फोटोचा उपयोग स्वतःचा मूड सांगण्यासाठी करुन केटीने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या अशा स्वरुपाची नाराजी अनेकांनी व्यक्त केली आहे.

एखाद्या विषयाचा आधार घेऊन व्यक्त होण्याआधी त्या विषयाची पुरेशी माहिती घेतली पाहिजे. हिंदू संस्कृतीची माहिती नसताना काली मातेच्या फोटोचा केटीने ज्या पद्धतीने उपयोग केला तो प्रकार भावना दुखावणारा आहे. स्वतःचा मूड ठीक नाही हे सांगण्यासाठी एखाद्या देवीचा फोटो वापरणे योग्य नाही असे मत मांडत अनेकांनी केटीवर सडकून टीका केली. काही जणांनी केटीच्या मुर्खपणाची कीव वाटते असे सांगत तिला पोस्ट हटवण्यास सांगितले.

सोशल मीडियावर आपल्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे पाहून सावध पवित्रा घेत केटीने माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता असे सांगितले.

या आधी अमेरिकेतील एका कंपनीने बिअरच्या बाटलीवर गणपतीचा फोटो छापला होता. तर पादत्राणांची निर्मिती करणाऱ्या एका कंपनीने आपल्या चपलांवर ओम छापले होते. गेल्या वर्षी दिवाळीच्या तोंडावरच अॅमेझॉन या संकेतस्थळावर विक्रीस ठेवलेल्या पायपुसण्यावर तिरंग्याचा फोटो छापण्यात आला होता. यावरुन खळबळ उडाली होती. परराष्ट्र मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतल्याने नंतर अॅमेझॉनने ते पायपुसणे संकेतस्थळावरुन हटवले होते.

current mood

A post shared by KATY PERRY (@katyperry) on

आपली प्रतिक्रिया द्या