काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पद मिळवण्यासाठी प्रभारींना 50 कोटी रुपये दिले, तेलंगाणातील नेत्याचा आरोप

तेलंगाणा काँग्रेसचे सचिव कौशिक रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजानीमा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत आपला निर्णय जाहीर केला होता. या पत्रकार परिषदेत त्यांनी तेलंगाणातील काँग्रेस नेत्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. रेवंथ रेड्डी हे तेलंगाणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. रेवंथ रेड्डी यांनी प्रदेशाध्यक्षपद आपल्यालाच मिळावं यासाठी तेलंगाणाचे काँग्रेस प्रभारी मणिकम टागोर यांना 50 कोटी रुपये दिल्याचा आरोप कौशिक रेड्डींनी केला आहे.

कौशिक टागोर हे लवकरच तेलंगाणा राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे . त्यांची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली असून त्यामध्ये ते आपल्याला ‘तेरास’ पक्षाचे तिकीट मिळणार असून पक्षाच्या सगळ्या युवा नेत्यांची मी ‘व्यवस्थित’ काळजी घेतो, पैसे देतो असं म्हणताना ऐकायला मिळतायत. तेलंगाणाचे काँग्रेस प्रभारी माणिकम टागोर यांनी कौशिक यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं म्हणतानाच ‘तेरास’ प्रती निष्ठा असलेले माझ्यावर नेहेमीच आरोप करत आले आहेत असं म्हटलंय. या सगळ्या प्रकरणी माझे वकील मदुराई न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं टागोर यांनी म्हटलंय.

आपली प्रतिक्रिया द्या