अभिनेत्रीला पाठवत होता अश्लील फोटो, पोलिसांचे कारवाईचे आदेश

टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक हिला एक व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील फोटो पाठवत होता.
नंतर कविताने या व्यक्तीचा फोटो ट्विटरवर शेअर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांकडे दाद मागितली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत.

kavvita-kaushik

कविता कौशिक हिच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर एक शंकर नावाचा व्यक्ती गुप्तांगाचे आणि अश्लील फोटो पाठवत होता. यावर कविताने ट्विटरवर या व्यक्तीची माहिती शेअर करून संताप व्यक्त केला आहे.

ट्विटरवर कविताने म्हटले आहे की सध्या या पवित्र दिवसात हा व्यक्ती मला अश्लील फोटो पाठवत आहे, माझ्या सारख्या व्यक्तीची ही अवस्था तर साधारण मुलींचे काय होत असेल अशी भिती व्यक्त करत कविताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांकडे दाद मागितली आहे. मुंबई पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या