KBC11 – मध्यान्ह भोजन बनवणारी महाराष्ट्रातील महिला झाली करोडपती

2688

‘कौन बनेगा करोडपती’च्या अकराव्या भागातील दुसरा करोडपती विजेता मिळाला आहे. बिहारमधील सनोज राज यांनी 1 कोटी रुपये जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील एका महिलेने 1 कोटी रुपये जिंकले आहेत. सोनी चॅनेलने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

केबीसीच्या आगामी भागाचा हा प्रोमो आहे. या व्हिडीओमध्ये बबिता ताडे नावाची महिलेबाबत माहिती देण्यात आलेली आहे. बबिता या महाराष्ट्रातीत अमरावती येथील रहिवासी आहेत. येथे एका शाळेमध्ये त्या मुलांसाठी मध्यान्ह भोजनात खिचडी बनवण्याचे काम करतात. प्रोमोमध्ये शोचे होस्ट बिग बी अमिताभ बच्चन बबिता यांना त्यांच्या वेतनाबाबत प्रश्न विचारतात. त्यावेळी त्या महिन्याला 1500 रुपये मिळतात असे सांगतात.

kbc11

बबिता म्हणतात, या शोद्वारे एक खिचडी बनवणारी महिला देखील खूप काही करू शकते हे मला दाखवून द्यायचे होते. प्रोमोच्या शेवटी अमिताभ बच्चन ‘एक कोटी रुपये’ असे बोलतात आणि बबिता यांचा चेहरा आनंदाने फुलतो. त्यावरून बबिता या शोच्या दुसऱ्या करोडपती विजेत्या असणार आहेत हे स्पष्ट झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या