आपला फोन सुरक्षित ठेवा…

77

अमित घोडेकर, [email protected]

नाशिकमध्ये बऱयाच जणांचे व्हॉट्स ऍप हॅक झाले. आपला फोन  कसा सुरक्षित ठेवायचा?

गेल्या आठवडय़ात नाशिकमधील अनेक नामांकित लोकांचे ‘व्हॉटस् ऍप’ हॅक झाले आणि व्हॉटस् ऍपच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. खरे तर गेल्या काही वर्षांपासून मोबाईल म्हणजे जवळपास ‘व्हॉटस् ऍप’मय झाला आहे. कोटय़वधी लोक व्हॉटस् ऍपचा वापर करून सकाळच्या ‘‘गुड मॉर्निंग’’पासून ते रात्रीच्या ‘‘गुड नाईट’’साठी फक्त आणि फक्त व्हॉटस् ऍपचाच वापर करतात. त्यामुळे व्हॉटस् ऍप हॅक झाल्यामुळे सर्वत्र काळजीचे वातावरण आहे.

नाशिकमधील ‘व्हॉटस ऍप’ हॅक प्रकरणात अनेक लोकांचे व्हॉटस् ऍप’ हॅक केल्यानंतर त्यांच्या मित्रमैत्रिणींना अश्लील मेसेजेस पाठवले गेले. त्यानंतर मग अनेक लोकांनी सदर गोष्टीची तक्रार करायला सुरुवात केली आणि मग नाशिकमधील हा व्हॉटस् ऍपचा झोल उघडकीस आला.

काही वर्षांपूर्वीही ‘व्हॉटस् ऍप’ हॅक झाल्यामुळे अनेक महिला अशा प्रकारच्या नवीन सायबर गुन्हेगारीला बळी पडल्या होत्या. अनेकदा अनेक महिलांना तुमचा अश्लील फोटो आमच्याकडे आहे. ‘‘जर तुम्हाला तो बघायचा असेल तर आम्हाला संपर्क करा’’ अशा प्रकारचे मेसेजेस पाठवले गेले होते, तर अनेकदा अनेक महिलांना अनोळखी क्रमांकावरून ‘व्हॉटस् ऍप’वर अश्लील मेसेजेस, फोटोदेखील पाठवले गेले होते. त्यामुळे अनेक महिला अशा प्रकारच्या सायबर गुह्याला बळी पडल्या होत्या.

जगात अनेक ठिकाणी सोशल नेटवर्किंग आणि मेसेजिंग सर्व्हिसेसचा वापर करून मोठय़ा प्रमाणात सायबर गुन्हे केले जातात. सध्या जगातील सगळ्यात जास्त भीतीदायक गोष्ठ कुठली असेल तर ती म्हणजे आपला मोबाईल. आपला मोबाईल म्हणजे आपले चालते बोलते रूपच आहे. आपल्या मोबाईलला आपण काय करतो, कुठे राहतो, कोणत्या बँकेत कोणता व्यवहार करतो ते अगदी आपल्याला काय आवडते अशा सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि आपला मोबाईल सहजपणे हॅक करण्याचे तंत्र म्हणजे ‘व्हॉटस् ऍप’ हॅक करणे कारण आपण सगळ्यात जास्त मोबाईलवर काय वापरतो तर ते म्हणजे ‘व्हॉटसअप.’ त्यामुळे एकदा का आपला मोबाईल हॅक केला की, एक प्रकारे आपणच हॅक होऊ शकतो आणि त्यानंतर अनेक प्रकारचे गुन्हे घडू शकतात.

सावधानता

अनोळखी लोकांचे मेसेजेस किंवा फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.

जर तुम्हाला सोशल नेटवर्किंग आणि मेसेजिंग सर्व्हिसेसचा वापर करून त्रास देत असेल त्या व्यक्तीला ब्लॉक करून टाका.

अशा प्रकारचे मेसेजेस तसेच व्यक्तींना अब्युसिंग या श्रेणीत टाका. त्यामुळे ते इतरांनादेखील त्रास देऊ शकणार नाहीत.

जर तुम्हाला तुमच्या व्हॉटस् ऍप किंवा फेसबुकचा वन टाईम पासवर्ड अचानक आला तर तो कोणालाही देऊ नका.

व्हॉटस् ऍप किंवा फेसबुकला अजून एका पासवर्डचा वापर करून सुरक्षित करा.

 

आपली प्रतिक्रिया द्या