भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा गुन्हा!

39

सामना ऑनलाईन । पुणे

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अटक केली. मात्र, त्यांच्या आतापर्यंतच्या चौकशीतून कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यानंतरही भुजबळांना तुरुंगात ठेवणे हा गुन्हा आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. पुण्यात आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना भुजबळ यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी पंतप्रधान झाल्याचे नरेंद्र मोदी यांचे विधान म्हणजे एक नौटंकी आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी प्रथम आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली, असा टोला त्यांनी पंतप्रधानांना हाणला.

आपली प्रतिक्रिया द्या