सायकल चोरीची तक्रार दाखल करायला गेला मुलगा, पुढे जे घडलं ते होतं अनपेक्षित

प्रातिनिधिक फोटो

खाकीतल्या देव माणसाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. एका शाळकरी मुलाची नवीन सायकल चोरी झाल्याने तो फार दु:खी होऊन पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचला. त्या मुलाचे सायकलवरील प्रेम पाहून भल्या पोलिसांना त्याची दया आली आणि त्यांनी या मुलाला चक्क नवीन सायकल गिफ्ट केली. केरळ पोलिसांच्या या अनोख्या मदतीमुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

169070248_438727067421765_1633587710828129788_n

लतीफ अट्टाप्पडी यांची एक पोस्ट सध्या फेसबुकवर चांगलीच वायरल होत आहे. लतीफ यांनी ही स्टोरी फेसबुकवर शेअर केली होती. ते पलक्कड येथील रहिवासी असून व्यवसायाने ते एक दुकानदार आहेत. त्यांच्या या स्टोरीला बारा हजार शेअर मिळाले आहेत. त्यांची ही पोस्ट वाचून केरळमधल्या शोलायूर पोलीस ठाण्यातील पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

एक शाळकरी मुलगा त्याची सायकल चोरी झाल्याने आपल्या शेजाऱ्यांना घेऊन पोलीस स्थानकात तक्रार नोंदवायला  आला होता. तो फार दु:खी झाला होता. त्याचे सायकलवरचे प्रेम पाहून त्या मुलासाठी काहीतरी करावेसे पोलिसांना वाटले. त्याची तळमळ पोलीसांच्या लक्षात आली. त्याचे दु:ख आणि सायकल प्रेम लक्षात घेत पोलिसांनी त्याला सायकल भेट देण्याचे ठरवले.

लतीफ यांनी पुढे लिहीलेय की, या मुलाच्या सायकलच्या प्रेमापोटीच त्याला नवीन सायकल मिळाली. त्याच्या शेजाऱ्याने त्याच्यासोबत येऊन पोलोीस स्थानकात तक्रार केली. या मुलाने घराच्या बाहेर सायकल ठेवली होती तिथून ती चोरी झाली असे तक्रारीत म्हंटले होते. जोकी स्टेशन हाऊसचे ऑफिसर विनोद कृष्णा त्याचे सायकल प्रेम पाहून प्रभावित झाले. त्यांनी लगेच त्या मुलासाठी नवीन सायकल घेण्याचा निर्णय घेतला. विनोद यांनी आपल्या पोलीस मित्रांच्या मदतीने त्या मुलाला सायकल गिफ्ट केली. त्यानंतर सायकल पाहून मुलाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो फार आनंदी झाला. त्याच्या चोरी झालेल्या सायकलचा शोध सुरु असल्याचेही पोलीसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या