कोरोनाशी यशस्वीरित्या लढा दिल्याबद्दल केरळच्या आरोग्यमंत्री शैलजा यांचा UN कडून गौरव

641

कोरोना संकटाशी यशस्वी सामना केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघटनेने केरळच्या आरोग्य मंत्री के शैलजा यांचा सन्मान केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेचा हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे. त्यात अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे ज्यांनी कोरोना संकटकाळात मोठे काम केले होते.

के शैलजा म्हणाल्या की राज्यात यापूर्वी निपाह सारखा विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता. तसेच 2018 आणि 2019 मध्ये सलग दोनदा राज्याला पुराचे संकट आले होते. या काळात आरोग्य विभागाने उत्तम कामगिरी केली. म्हणून कोरोनाचे संकट हातळण्यात मदत झाले असे शैलजा म्हणाल्या.


वुहानमध्ये कोरोनाचे संकट वाढले तेव्हापासून केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्न करणयत आले असे शैलजा म्हणाल्या. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व नियम लागू करून उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळेच कोरोनाचा कोन्टॅक्ट स्प्रेड रेड 12.5 च्या खाली आणि मृत्यू दर 0.6 टक्क्यांच्या खाली आणण्यात यश आले. के शैलजा म्हणाल्या की यसाठी कोरोना रुग्ण शोधणे, त्याला विलगीकरण कक्षात ठेवणे, पुन्हा चाचणी, विलग आणि उपचार, साखळी तोडणे अशी उपाययोजना करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या