गड्याहो, तुमचा हिंदुस्थानच बरा!

3226

कोरोना महामारीत हिंदुस्थान भेटीवर येऊन लॉकडाऊनमुळे केरळच्या कोची महानगरात अडकलेले जेष्ठ अमेरिकन नागरिक हिंदुस्थान सोडायला तयार नाहीत. 74 वर्षीय जॉनी पियर्स हिंदुस्थान सरकार कोरोनाग्रस्तांची करीत असलेली सेवा पाहून खुश आहेत. ते म्हणतात, अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची आमचे अमेरिकन सरकार तुमच्या देशाच्या सरकारप्रमाणे काळजी घेत नाहीय. त्यामुळे मला आता कायम हिंदुस्थानातच राहायचे आहे. पियर्स यांनी आपला पर्यटन व्हिसा बिसिनेस व्हिसामध्ये परिवर्तित करावा असे साकडे केरळ उच्च न्यायालयाला एका निवेदनाद्वारे घातले आहे. नव्या व्हिसावर आपल्याला किमान 180 दिवस हिंदुस्थानात सहकुटुंब राहायला मिळेल असे पियर्स यांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या