केरळच्या नन मरियम थ्रेसिया यांना संतपद

526

केरळ येथे मुलींच्या शिक्षणासाठी आणि सबलीकरणासाठी झटणार्‍या नन मरियम थेसिया यांना संतपद मिळाले आहे. पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन सिटी येथे नन मरियम यांना संतपद बहाल केल्याची घोषणा केली. मृत्यूनंतर 93 वर्षांनी त्यांना हा सन्मान मिळाला आहे.

नन मरियम थेसिया यांचा जन्म 26 एप्रिल 1876 रोजी केरळच्या त्रिशूर जिह्यात झाला. सिस्टर मरियम यांनी होली फॅमिली नावाची धर्मसभा स्थापन केली होती. 1941 मध्ये स्थापन झालेल्या होली फॅमिलीत सध्या सुमारे दोन हजार नन आहेत. व्हॅटिकन सिटीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अनेक शाळा, वसतिगृहे, अनाथाश्रम सुरू केले. केरळातील गरीब आणि कुष्ठरोगपीडितांची सेवा केली. पोप जॉन पॉल द्वितीय यांनी 1999 साली सिस्टर मरियम यांना पूजनीय तर 2000 साली पवित्र आत्मा घोषित केले होते. त्यांच्या चमत्कारांनाही पोप यांनी मान्य केले होते. नन मरियन यांना रविवारी संतपद बहाल केल्यानंतर केरळ येथील कॅथॉलिक चर्चमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

आपली प्रतिक्रिया द्या