व्हीव्हीपॅट मशीनमध्ये घुसला साप, थांबवावे लागले वोटींग

सामना ऑनलाईन। कन्नूर

केरळमधील कन्नूर लोकसभा मतदारसंघात अचानक आलेल्या ‘एका आगंतुक पाहुण्यामुळे’ मतदारांची आणि बूथवरील कर्मचाऱ्यांची पुरती दमछाक झाली. यामुळे काही वेळासाठी अधिकाऱ्यांना मतदान थांबवावे लागले. हा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून छोटा साप होता. हा साप व्हीव्हीपॅट मशीनमध्ये घुसला. यामुळे वोटींग करण्यासाठी आलेल्या मतदारांचे आणि कर्मचाऱ्यांचे पुरते धाबे दणाणले. अखेर नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले.

कन्नूर लोकसभा मतदारसंघातील मय्यिल कंदक्कई निर्वाचन क्षेत्रातील बूथमध्ये हा साप घुसला होता. मतदान सकाळपासून सुरू झाल्याने लोकांची बूथबाहेर गर्दी होती. या गर्दीत साप कुठुन आला व कसा व्हिव्हीपॅट मशीनमध्ये घुसला हे कोणालाच कळाले नाही. पण ज्यावेळी एक मतदार वोटींग करण्यासाठी बूथमध्ये आला. त्यावेळी व्हिव्हीपॅटमध्ये साप असल्याचे बघताच त्याला दरदरून घाम फुटला. त्याने लगेच याबद्दल तेथील कर्मचारी व पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सापाला बाहेर काढले. पण यादरम्यान वोडींग थांबवावे लागले. त्यानंतर सापाला तिथून हटवण्यात आले व मतदान पुन्हा सुरू करण्यात आले.