CAA वरून रणकंदन; केरळच्या राज्यपालांनी भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांचे कान टोचले, वाद चिघळणार

602
kerala-governor-arif-mohamm

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा CAA लागू केल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. केरळ आणि पंजाब, प. बंगाल या राज्याच्या विधानसभेकडून CAA ला विरोध करण्यात आला. CAA रद्द करण्याची मागणी केरळकडून सर्वप्रथम करण्यात आली होती. त्यानंतर आता केरळचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात CAA च्या मुद्द्यावरून वाद झाला आहे. त्याचा व्हिडीओ देखील एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला आहे.

केरळचे राज्यपाल आरिफ मोहमद खान यांनी राज्य सरकारची भूमिका मांडणारे भाषणवाचून दाखवताना आपली भूमिका राज्य सरकारपेक्षा वेगळी असल्याचे स्पष्ट केले. भाषण वाचत असताना ते एका मुद्द्यावर आले आणि त्यांनी पुढील CAA विरोधाचा मुद्दा हा सरकारचे धोरण किंवा कार्यक्रमाचा भाग नाही, असे स्पष्ट केले. मात्र असे असून देखील राज्याचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या आग्रहामुळे मला पटत नसताना देखील पुढील परिच्छेद मी वाचत आहे, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. त्यानंतर त्यांनी CAA विरोधातील राज्य सरकारचा पुढला परिच्छेद लिहून दिल्याप्रमाणेच वाचला.

मात्र आता केरळचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील दरी वाढत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. त्यामुळे हा वाद आळखी चिघळणार अशी शक्यता व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या