हिंदुस्थानची ११ वर्षीय कन्या बनली ‘फुटबॉल गर्ल’

8


सामना ऑनलाईन । मॉस्को

फिफा वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानला खेळण्याची संधी मिळाली नसली तरी हिंदुस्थानच्या तामीळनाडूमधील एका चिमुरडीमुळे सन्मान मात्र मिळाला आहे. अरेना सेंट पीटर्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या कोस्टारिकाविरुद्ध ब्राझिलच्या सामन्यात ’फुटबॉल गर्ल’ होण्याचा मान ११ वर्षीय नथानिया जॉन हिला मिळाला आहे.

स्टार फुटबॉलपटू नेमारच्या ब्राझीलच्या संघासोबत मैदानात उभे राहण्याचा मान तिला मिळाला आहे. फिफा वर्ल्डकपच्या सामन्यावेळी फुटबॉल मैदानात घेऊन जाण्याचा सन्मान मिळवणारी नथानिया जॉन ही पहिली हिंदुस्थानी ठरली आहे. २००२च्या फिफा वर्ल्डकपमध्ये तामीळनाडूचे रेफरी शंकर यांनी पहिल्यांदा सहभाग घेतला होता. त्यानंतर हिंदुस्थानला नथानिया हिच्या रूपाने फिफा वर्ल्डकपच्या मैदानात सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. नथानिया ही तामीळनाडूमधील चिट्टूरच्या ऋषी व्हॅली स्कूलमध्ये सहावीत शिकत असून तिला कर्नाटकच्या ऋषी तेजसोबत ही संधी मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या