हानिकारक धार्मिक प्रथांना रोखलं जायला हवं – केरळ उच्च न्यायालय

समाजासाठी अहितकारक, कोणताही वैज्ञानिक आधार नसलेल्या आणि हानिकारक प्रथा जरी धार्मिक असल्या तरीही त्या बंद झाल्या पाहिजेत, अशी स्पष्टोक्ती केरळ उच्च न्यायालयाने दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.

केरळ उच्च न्यायालयाच्या न्या. व्ही. जी. अरुण यांच्या एकलपीठासमोर एका प्रकरणाची सुनावणी पार पडली. त्यावर स्पष्ट करताना न्यायमूर्ती अरुण म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांनुसार, खऱ्या धार्मिक अभ्यासासाठी परंपरांचं अंधपणे पालन न करता, कार्यकारण, समानता आणि मानवतावादी मूल्यांना महत्त्व दिलं पाहिजे. त्यामुळे जरीही पशुहत्येसारख्या गोष्टी जरीही धार्मिक कारणासाठी केल्या गेलेल्या असतील तरी सगळ्या समाजासाठी अहितकारक, वैज्ञानिक आधार नसलेल्या आणि हानिकारक प्रथांना थांबवणंच योग्य आहे, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

उदाहरणार्थ, जरी कलम 25 अन्वये दिलेल्या अधिकारांच्या योग्य समजुतीनुसार आणि कलम 21 अन्वये दिलेल्या स्वातंत्र्याच्या अधिकारांचा विचार करता, जरी पशुबळी हा धार्मिक आस्थेचा भाग असला आणि त्यात हस्तक्षेप करणं शक्य नसलं तरी जर दुसऱ्यासाठी ही प्रथा त्रासाचं कारण बनत असेल, तर ती रद्द झाली पाहिजे, असं न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं.