‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेनचा अपघात

बहुचर्चित ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा अपघात झाला आहे. दोघंही 14 मे रोजी तेलंगणाच्या करीमनगर हिंदू एकता यात्रेत सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा अपघात झाला.

अपघातानंतर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त करायला सुरूवात केली आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यानंतर अदा शर्माने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिची हेल्थ अपडेट दिली आहे. अदा शर्माने आपल्या पोस्टमध्ये लिहीलेय की, मित्रांनो मी ठीक आहे. आमच्या अपघाताच्या बातम्या प्रसारीत झाल्यानंतर अनेकांचे मेसेज येत आहेत. संपूर्ण टीम आणि आम्ही सर्व ठिक आहोत. काहीही गंभीर नाही. तुम्ही दाखलेले प्रेम आणि काळजी यासाठी तुमचे मनापासून आभार


अदा शर्मा ने किया अपडेट

तर इंस्टास्टोरीवरही तिने मेसेज टाकला आहे. ”मित्रांनो मी ठीक आहे. आमच्या अपघाताच्या बातम्या प्रसारीत झाल्यानंतर अनेकांचे मेसेज येत आहेत. मी सांगू इच्छिते की, आम्ही ठीक आहोत. काही मोठे झालेले नाही. आमची काळजी दाखवल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद”.

याआधी दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी हिंदू यात्रेला जाण्यापूर्वी अपघाताचा बळी झाल्याची माहितीही शेअर केली होती. सुदीप्तो सेन यांनी लिहिले आहे –


”आज (14 मे) आम्ही एका युवा सभेत आपच्या सिनेमाविषयी बोलण्यासाठी करीमनगर येथे जाणार होतो. मात्र दुर्दैवाने काही आपत्कालीन आरोग्य समस्यांमुळे आम्ही प्रवास करू शकलो नाही. करीमनगरवासीयांची मनापासून माफी मागतो. आमच्या मुलींना वाचवण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवला आहे. कृपया आम्हाला सपोर्ट करत रहा”.