एकटं राहण्यासाठी कुटुंबीयांना खाऊ घातलं विषारी आईस्क्रीम, रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी बहिणीचा मृत्यू

1338
murder

आपल्या बहिणीच्या आईस्क्रीममध्ये विष मिसळून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी एका 22 वर्षीय व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की आरोपीने त्याला “एकटे” राहायचे असल्याने त्याच्या बहिण आणि आई-वडिलांच्या आईस्क्रीममध्ये विष घातले. केरळच्या कासारगोड शहरात 4 ऑगस्ट रोजी रात्री ही घटना घडली.

पोलिसांनी सांगितले की, कासारगोड येथे 5 ऑगस्ट रोजी 16 वर्षांच्या मुलीचा मृत्यू हा अपघाती नसून तो खून असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी सांगितले की, मुलीचा भाऊ अल्बिन याने कबुली दिली आहे की, त्यानेच आपल्या बहिणीच्या आईस्क्रीममध्ये विष मिसळले होते. त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

त्याचवेळी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर त्रास झाल्याने मुलीचे वडील बेनी यांनाही 5 ऑगस्ट रोजी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पोलिसांनी सांगितले की, तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या