पळपुटय़ा अमृतपाल सिंगचे शेवटचे लोकेशन हरयाणात

खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला फरार घोषित केले आहे. त्याच्या सहकाऱयांना पोलिसांनी अटक केली असून अजूनही अमृतपाल पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, पळपुटय़ा अमृतपालचे शेवटचे लोकेशन हरयाणात असल्याची माहिती पंजाबचे पोलिस महानिरीक्षक सुखचैनसिंग गिल यांनी दिली.

पोलीस महानिरीक्षक सुखचैनसिंग गिल म्हणाले, अमृतपालचे शेवटचे लोकेशन हरयाणात आढळले आहे. अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱयाला कुरुक्षेत्र येथील आपल्या घरी आश्रय देणाऱया बलजीत काwर या महिलेला आम्ही ताब्यात घेतले.

19 मार्चच्या रात्री अमृतपाल आणि पापलप्रीत यांनी आपल्या घरी आश्रय घेतला. दुसऱया दिवशी सकाळी ते निघून गेले, अशी माहिती या महिलेने  तपासादरम्यान दिल्याचे गिल यांनी सांगितले. आम्ही सीसीटीव्ही  तपासत आहोत. लवकरच अमृतपालला अटक करू असेही ते म्हणाले.