खार पोलीस ठाण्यातील 8 पोलिसांनी केले प्लाझ्मा दान

254

कोरोनाशी दोन हात केलेल्या खार पोलीस ठाण्यातील 18 पैकी 8 पोलिसांनी पालिकेच्या नायर रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान केले आहे. प्लाझ्मा दान करणाऱया त्या पोलिसांचे सर्कत्र कौतुक होत आहे.

राज्य पोलीस दलात कोरोना बाधित पोलिसांची संख्या वाढत आहे. पोलिसासाठी कोविड सेंटरची सुविधा, त्याना समुपदेशन, आरोग्याच्या सुविधा पुरवल्या जात असल्याने ते कोरोनावर मात करून कर्तव्यावर हजर होत आहेत. खार पोलीस ठाण्यातील 18 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्या सर्वांनी कोरोनावर मात केली आहेत. पोलीस शिपाई भिकाजी परब याना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या आईला देखील कोरोनाची लागण झाल्याने झाली. त्याच्यावर अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान परब यांच्या आईचा मृत्यू झाला. आपण आपल्या आईला वाचवू शकलो नाही. पण प्लाझ्मा दान केल्यास इतरांचा जीव वाचू शकेल ही भावना मनाशी बाळगत परब यांनी प्लाझमा दान करण्याचा निर्णय घेतला.

परब यांनी नायर रुग्णालयात जाऊन प्लाझमा दान केले. त्यानंतर टप्या टप्याने 7 पोलिसांनी प्लाझमा दान केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काबदूले यांनी सांगितले. प्लाझमा दान करण्या अगोदरआठवडा भर आदी एक चाचणी केली जाते. त्यानतर प्लाझ्मा दान करणाऱयाला बोलावले जाते. रस्त्यावर कोरोनाशी दोन हात करणारे पोलीस प्लाझ्मा दान करून नागरिकाचे प्राण वाचकत असल्याने राज्य पोलीस दलासाठी ही अभिमानाची बाब आहे.

आपली प्रतिक्रिया द्या