खारेगाव टोलनाक्याला अखेरची घरघर

35

सामना प्रतिनिधी । ठाणे

राज्यातील लौकिक असलेला पहिला खारेगाव टोलनाका १३ मे च्या मध्यरात्रीपासून कायमचा बंद होणार आहे. त्यामुळे वसुलीलादेखील ‘ब्रेक’ लागणार असून हजारो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच खारेगाव टोलनाका येथे होणारी वाहतूककोंडीदेखील दूर होणार आहे. सरकारने हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश दिले असून आता मुंबई-नाशिक प्रवास सुसाट होणार आहे.

मुंबई-नाशिक मार्गावरील खारेगाव हा अतिशय महत्त्वाचा टोलनाका समजला जातो. १९९८ पासून तो सुरू करण्यात आला. रस्तेउभारणी व देखभाल करण्यासाठी १८० कोटी रुपये वसूल करण्याची परवानगी आयआरबीला सरकारने दिली होती. मात्र प्रत्यक्षामध्ये अनेक पटीने ही वसुली केली असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी केला आहे. १९९८ ते २०१७ या दरम्यान करोडो वाहनांकडून मोठ्या प्रमाणावर टोल वसूल करण्यात आला. मूळ रक्कम मिळूनही वसुली सुरूच राहिल्याने खारेगाव टोलनाका बंद करावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. आता त्यास यश आले आहे.

टोलमुक्तीबरोबरच वाहतूककोंडीतूनही सुटका

खारेगाव टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी रोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. या ट्रॅफिक जॅममुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून वेळही पुâकट जातो. आता १३ मेपासून टोलमुक्तीबरोबरच वाहतूककोंडीतूनही सुटका होणार आहे. त्याचप्रमाणे वाहनचालकांची आर्थिक बचतदेखील होणार आहे.

… तर फौजदारी गुन्हा दाखल करा!

१३ मेच्या मध्यरात्रीपासून खारेगाव येथील टोलनाका कायमचा बंद करावा, असा आदेश सरकारने दिला असून गॅझेटमध्येदेखील त्याची नोंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे टोलधाडीतून प्रवाशांची खNया अर्थाने सुटका होईल. मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही तर संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करावा. – चंद्रहास तावडे

आपली प्रतिक्रिया द्या