कमर बाजवांची कढी पातळ झाली होती, घाबरून केली होती अभिनंदन यांची सुटका

पाकिस्तानात असलेला हिंदुस्थानचा दरारा पुन्हा एकदा दिसून आला आहे. हिंदुस्थान हल्ला करेल या भीतीनेच हिंदुस्थानी हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यात आल्याचा खुलासा पकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी केला आहे. पाकिस्तानच्या संसदेत असिफ यांनी केलेल्या वक्तव्यातून हिंदुस्थानचा दरारा आणि पाकिस्तानच्या मनात असलेली भीती स्पष्ट झाली आहे.

हिंदुस्थान हल्ला करेल ही चिंता पाकिस्तानला सतावत होती. या हल्ल्याची भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळे हिंदुस्थानला शांत करण्यासाठी अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यात आल्याचे असिफ यांनी सांगितले. पाकिस्तानच्या संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनीही त्यावेळी हिंदुस्थानच्या हल्ल्याच्या असलेल्या भीतीबाबत माहिती दिली आहे.

हिंदुस्थान हल्ला करेल या भीतीने तत्कालीन लष्करप्रमुख कमर बाजवा यांना धडकी भरली होती. भीतीने त्यांचे पाय लटपटत होते. गाळण उडाल्याने चेहऱ्यावर घाम आला होता. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती,असे सादिक यांनी सांगितले. अभिनंदनची सुटका केली नाही, तर हिंदुस्थान रात्री 9 वाजता हल्ला करेल अशी भीती होती. त्या भीतीने परराष्ट्रमंत्री शाह मेहमूबद कुरेशी थरथरत होते. ‘खुदा के वास्ते उसे जाने दो’, असे अभिनंदनबाबत ते बोलले. त्यातून त्यांना असलेली हिंदुस्थानच्या हल्ल्याची भीती दिसत होती.

फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ल्यासाठी लढाऊ विमाने पाठवली होती. त्यांचा हल्ला परतवून लावण्यासाठी हिंदुस्थानी हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग 21 ने उड्डाण केले. पाकिस्तानच्या विमानांना परतवून लावत असताना त्यांचे विमान पाकव्याप्त कश्मीरमध्ये कोसळले आणि पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतले होते. अभिनंदन यांच्या सुटकेसाठी हिंदुस्थानने पाकिस्तानवर दबाव टाकला होता. त्यानंतर अभिनंजन यांची सुटका करण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानने हिंदुस्थानच्या हल्ल्याच्या भीतीने अभिनंदन यांची सुटका केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाकिस्तानच्या संसदेतच हिंदुस्थानचा असलेला दरारा आणि भीती स्पष्ट झाली आहे. त्यावेळी पाकिस्तानने कितीही दर्पोक्ती केली असली तरी तो मनातून घाबरलेला होता, हे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री आणि तत्कालीन लष्करप्रमुख यांची भीतीने गाळण उडाली होती, हे पाकिस्तानी संसदेत करण्यात आलेल्या खुलाशावरून स्पष्ट होते.

आपली प्रतिक्रिया द्या