लोटे – रिव्हरसाईड इंडस्ट्रीला महसूल विभागाची 41 लाख 98 हजार रुपयांच्या दंडाची नोटीस

लोटे औद्योगिक वसाहतीतील रिव्हरसाईड इंडस्ट्रीज या रासायनिक कंपनीला महसूल विभागाने दंडाची नोटीस बजावली आहे. कंपनीच्या आवारात अनधिकृत उत्खनन केल्याचे निदर्शनाला आल्यावने ही नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय अनधिकृत माती उत्खनन केल्याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनावर फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा करत कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. खेडच्या तहासीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी उत्खनन करण्यात आलेल्या जागेची पाहणी करत कंपनी व्यवस्थापनाला तब्बल 41 लाख 98 हजार 400 रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे.