दुचाकीची एसटीला धडक

27

तीन जखमी

खेड– खेड-दापोली मार्गावर नारिंगी नदीपुलाजवळ दुचाकी एसटी बसला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर येथील एसएमएस रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.

बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फुरुस येथे राहणारे मतलाक मारुफ, वाकीब परकार आणि टेटवली येथे राहणारे मशकील टेटवलकर हे तिघे एकाच दुचाकीवरून खेडहून दापोलीकडे निघाले होते. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ते नारिंगी पुलाजवळ आले असता दापोलीहून खेडकडे येणार्‍या एसटी बसला त्यांची धडक बसली आणि ती दुचाकी एसटी खाली गेली.

या अपघातात तलाक मारूफ आणि वाकीब परकार या दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली तर शकील टेटवलकर हा किरकोळ जखमी झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी जखमींना तत्काळ भरणे नाका येथील एसएमएस रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी तलाक मारूफ आणि वाकीब परकार यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या