खेडमध्ये पुरामुळे 90 हुन अधिक नळपाणी योजना बाधित; भर पावसात आठ गावांना टँकरने पाणीपुरवठा

कोकणात झालेल्या महाप्रलंयकारी पावसामुळे खेड तालुक्यातील 95 पेक्षा अधिक नळपाणी योजनांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक नळपाणी योजना वाहून गेल्या आहेत तर काही गाळामध्ये रुतल्या आहेत. काही ठिकाणचे पंपहाऊस बिघडले असल्याने ग्रामस्थांना भर पावसात पाणी पाणी करावं लागत आहे. नळपाणी योजनांचे संभाव्य नुकसान सुमारे ४ कोटी रुपयांचे असावे असा अंदाज व्यक्त होत आहे.

गेल्या आठवड्यात ढगफुटीप्रमाणे कोसळलेल्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जगबुडी आणि नारंगी नदीला पूर येऊन अतोनात नुकसान झाले. एकाबाजूला पुरामुळे व्यापाऱ्यांचे, लोकांचे घरात दुकानात पाणी जाऊन तर नुकसान झालेच मात्र दुसऱ्या बाजूला गावागावात असणाऱ्या नळपाणी योजनाही बाधित झाल्याने भर पावसाळ्यात अनेक गावांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील 90 नळपाणी योजना बाधित झाल्या असून यापैकी काही योजनांचे पंपहाऊस वाहून गेलेत तर काही नळपाणी योजना गाळात रुतल्यामुळे त्याठिकाणी जाणे देखील शक्य होत नाही. मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यात नळपाणी योजनांचे तब्ब्ल ४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरातवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ बी. एन. पाटील यांनी तातडीने या सर्व बाधित नळपाणी योजनांचे सर्वेक्षण करून अहवाल मागवले असून बाधित योजना तत्काळ दुरुस्त करण्याला प्राधान्य दिले जाईल असे म्हटले आहे. नळपाणी योजना बाधित झाल्याने ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे त्या गावांना शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या