‘खेलो इंडिया’तील महाराष्ट्राच्या पदकविजेत्या खेळाडूंना मिळणार रोख पारितोषिक

218

गुवाहाटी (आसाम) येथे नुकत्यात पार पडलेल्या ‘खेलो इंडिया’ युका क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केली. मुंबईमध्ये हा गौरव सोहळा होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून तारीख निश्चित करण्यात येईल, असेही क्रीडामंत्र्यांनी सांगितले.

‘खेलो इंडिया’ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना एक लाख, रौप्यपदक विजेत्यांना 75 हजार आणि कास्यपदक विजेत्याला 50 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गौरव सोहळ्यात महाराष्ट्रातील 398 खेळाडूंना एकूण 3 कोटी 6 लाख 25 हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील. महाराष्ट्राच्या 590 खेळाडूंनी ‘खेलो इंडिया’तील 20 पैकी 19 खेळांत प्रतिनिधित्व होते. यंदा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 78 सुवर्ण, 77 रौप्य व 102 कास्य अशी एकूण 257 पदकांची कमाई करीत सलग दुसऱया वर्षीही सर्वसाधारण विजेतेपद पटकाविण्याचा पराक्रम केला. यात जलतरणपटूंनी सर्वाधिक 46 पदकांची कमी केली असून जिम्नॅस्टिकमध्ये 40, कुस्तीमध्ये 31, ऍथलेटिक्समध्ये 29 आणि केटलिफ्टिंगमध्ये 25 पदकांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या