संजीवराजे निंबाळकर यांची अध्यक्षपदी निवड

सामना ऑनलाईन । पुणे

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची निवडणुक पार पडली असून आता आगामी चार वर्षांमध्ये यामध्ये नव्या चेहऱयांना संधी देण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या नव्या नियमामुळे हा बदल झालेला दिसला. संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची अध्यक्षपदी वर्णी लागली असून रत्नागिरीचे संदीप तावडे सरचिटणीसपदी निवडून आले आहेत. या कार्यकारिणीत मुंबईच्या वैशाली लोंढे, ऍड. अरुण देशमुख यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनची नवी कार्यकारिणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष – संजीवराजे नाईक-निंबाळकर
उपाध्यक्ष – जितेंद्र आव्हाड (ठाणे), महेश गादेकर (सोलापूर), अशोक पितळे (नगर), विजयराव मोरे (रायगड), माणिक पाटील (सांगली), वैशाली लोंढे (मुंबई)
कार्याध्यक्ष – सचिन गोडबोले (पुणे)
सरचिटणीस – संदीप तावडे( रत्नागिरी)
सहाय्यक चिटणीस – ऍड. अरुण देशमुख (मुंबई ), राजेश सोनावणे (नंदुरबार), डॉ. पावन पाटील (परभणी), जयांशू पोळ (जळगाव), गंधाली पालांडे (ठाणे).
खजिनदार – ऍड. गोविंद शर्मा (संभाजीनगर)
संजीवराजे नाईक-निंबाळकर
संदीप तावडे