हृतिक रोशनने आंघोळ करू नये! कियारा आडवाणीने व्यक्त केली इच्छा

बॉलीवूड अभिनेत्री कियारा आडवाणी हिने एक भलतीच इच्छा व्यक्त केली आहे. अभिनेत्री नेहा धुपिया हिच्यासोबतच्या चॅट शो मध्ये तिने ही इच्छा व्यक्त केली आहे. हृतिक रोशन याने आंघोळ करू नये असं तिने म्हटलंय. त्याच्याप्रमाणेच आदित्य रॉय कपूर यानेही आंघोळ करू नये असं कियाराचं म्हणणं आहे.

hritik-roshan

कियारासोबतच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ नेहा धुपिया हिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये हिृतिक आणि आदित्य रॉय कपूर यांनी आंघोळ करू नये अशी कियाराने का म्हटलं, याचं उत्तर मिळतंय. कियाराने म्हटलंय की हे दोघे आहे तसेच चांगले दिसतात आणि त्यांना आंघोळीची गरज नाहीये.

kiara-advani-black-and-whit

या मुलाखतीमध्ये नेहाने कियाराला एका काल्पनिक परिस्थितीबाबत विचारलं होतं. तिने कियाराला विचारलं की जर सगळे बॉलीवूड अभिनेते एका घरात अडकले असतील तर त्यामध्ये सगळ्यात जास्त मनोरंजन कोण करेल? यावर कियाराने तत्काळ अक्षय कुमार याचे नाव घेतले.

नेहा धुपिया हिने कियाराला पुढे विचारलं की कोणता कलाकार असा असेल जो आंघोळ करणार नाही? यावर कियाराने म्हटलं की हृतिक रोशन आणि आदित्य रॉय कपूर यांनी आंघोळ करू नये असं मला वाटतं कारण ते दोघे आंघोळीशिवायही चांगले दिसतात. नेहाने शेअर केलेला हा व्हिडीओ बराच प्रसिद्ध झाला असून लोकं त्यावर तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रिया देत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या