किडस् फिल्म फेस्टिव्हल

462

डेल इंटरनेशनल किडस् फिल्म फेस्टिव्हल (डेलआयकेएफएफ) हा शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेला पहिला जागतिक चित्रपट महोत्सव आहे. महोत्सवात विद्यार्थ्यांना फक्त आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहण्याची संधीच नाही तर फिल्म मेकिंगचे मास्टर क्लासेसमध्ये शिकण्याची तसेच फिल्म मेकिंग स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल

फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन 40 देशांतील शाळांद्वारे करण्यात येईल तसेच 20 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहचायचे लक्ष आहे. महोत्सवाची सुरुवात बुधवारी मुंबईतील सेंट मेरी स्कूल येथून झाली. यावेळी ज्युरी राजीक मसंद, जया बच्चन, श्रीराम राघकन, मनीषा कोईराला, अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते सहभागी झाले. लहान मुलांमध्ये चित्रपटांच्या जादुई जगाची ओळख निर्माण करण्याचा आणि त्यांना प्रेरित करण्याचा महोत्सवाचा उद्देश आहे. डेल इंटरनेशनल किडस् फिल्म फेस्टिक्हलचे यंदाचे तिसरे पर्व आहे. त्यामध्ये पर्यावरण, अंतराळ, बालपण अशा अनेक मुद्दय़ांवर 40 देशांतील 35 भाषांमधील 100 चित्रपटांची निकड करण्यात आली आहे. डेल कंपनी देशात डिजिटल साक्षरतेसाठी प्रयत्न करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या