दहशतवाद्यांनो जवानांच्या ऐवजी भ्रष्टाचार्‍यांना गोळ्या घाला, जम्मू कश्मीरच्या राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

33

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जवानांना मारण्या ऐवजी भ्रष्टाचारी लोकांना गोळ्या घाला असे आवाहन त्यांनी दहशतवाद्यांना केले आहे. आपल्याच भावांना का गोळ्या घालता जे तुमचे राज्य लुटतात त्यांना गोळ्या घाला असे मलिक म्हणाले. जम्मू मध्ये एका आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

मलिक म्हणाले की, “दहशतवादी सामान्य नागरिकांना ठार करतात. पोलिसांना आणि जवानांना गोळ्या घालतात. अरे तुम्ही तुमच्याच भावांना का मारता? त्यांना मारा ज्यांनी तुमचे राज्य लुटले आहे. ज्यांनी कश्मीरची सर्व संपत्ती लुटली. तुम्ही या पैकी कुणालाही मारले का? तुमच्या या कृत्यामुळे स्वकीयांचेच प्राण जात आहेत. यातून काहीच निष्पण्ण होणार नाही. बंदुकीने काही साध्य होणार नाही.” श्रीलंकेच्या तमिळ टायगर संघटनेलाही बंदुकीच्या जोरावर काही मिळवता आले नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले.

इससे पहले भी सत्‍यपाल मलिक घाटी में भ्रष्‍टाचार का मुद्दा उठा चुके हैं. एक कार्यक्रम में सत्‍यपाल मलिक यांनी यापूर्वीही कश्मीरच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवला होता. मलिक म्हणाले होते की कश्मीमध्ये दहशतवाद निर्मुलनासाथी जेवढे पैसे खर्च होत आहे त्यापैकी थोडेसे पैसे जरी विकासासाठी खर्च झाले असते तर आज कश्मीर हे सोन्याचे असते. इथल्या नेत्यांकडे अमाप संपत्ती आहे. त्यांची मोठ मोठी घरे असून त्यांच्या घरात कोट्यधी रुपयांचे कालीन आहेत. तर इथली सामान्य जनतेकडे साधा स्वेटर नाही असे त्यांनी म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या