किल्लारीत बंद घर फोडले, 1 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज पळवला

औसा तालुक्यातील किल्लारी येथे अज्ञात चोरट्याने बंद असलेले घर पाहून ते घर फोडले. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 1 लाख 95 हजारांचा ऐवज पळवण्यात आला.

या घरफोडीप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात शिवमूर्ती राम वाळके यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ते काही कामानिमित्त पुणे येथे गेले होते. घराला कुलूप लावून गेले असताना बंद कर पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे सर्व कुलूप तोडून घरात प्रवेश केला. 45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत 1 लाख 25 हजार आणि रोख 70 हजार, असा 1 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज पळवण्यात आला. किल्लारी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजपूत हे करत आहेत.