किम जोंगने बनवले नवे घातक क्षेपणास्त्र, अमेरिकेला उद्ध्वस्त करण्याची क्षमता

उत्तर कोरियाचा क्रूर हुकूमशहा किम जोंग उन, जो घातक क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी ओळखला जातो, त्या किम जोंग उनने नवीन अत्यंत घातक अण्वस्त्र वाहक क्षेपणास्त्र तयार केले आहे. ज्यामध्ये अमेरिकेतील कोणतेही शहर उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे. किम जोंग उन आणि पाश्चात्य देशांमधील चर्चा रखडली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र निर्मितीची बातमी आली आहे. Hwasong-15 असे या क्षेपणास्त्राचे नाव असून किम जोंग उन हे क्षेपणास्र सैन्य परेडमध्ये सादर करण्याची शक्यता आहे.

असे सांगितले जात आहे की किम जोंग उन यांच्या यंदाच्या सैनिकी परेडचे मुख्य आकर्षण Hwasong-15 क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र 1000 किलो स्फोटकासह 8000 मैल किंवा सुमारे 12800 किमी मारा करू शकते. उत्तर कोरियाच्या सरकार नियंत्रित माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही नवीन इंटरकॉन्टिनेंटल क्षेपणास्त्र प्रचंड अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता ठेवतात. तसेच या क्षेपणास्त्रातून संपूर्ण अमेरिकेला लक्ष्य केले जाऊ शकते.

सैन्य परेडच्या तयारीच्या छायाचित्रांमधून किम जोंग उन यांचे नवीन क्षेपणास्त्र लपविण्यासाठी नवीन रचना तयार केल्याचे समोर आले आहे. याव्यतिरिक्त, राजधानी प्योंगयांगमधील परेड ग्राउंडला जोडणारा ओक्रू पूलही दुरुस्त करण्यात आला आहे. काहीजणांचा असा दावा आहे की, ही क्षेपणास्त्र सहजपणे वाहून नेण्यासाठी या पुलाची दुरुस्ती करण्यात आली आहे.

उत्तर कोरियाची परेड मिरीम परेड प्रशिक्षण मैदानावर होईल. Hwasong-15 क्षेपणास्त्र सुमारे 16 मीटर लांबीचे आहे, जे किम जोंग उनच्या आवडत्या जुन्या क्षेपणास्त्र Hwasong-14 पेक्षा दोन मीटर कमी आहे. Hwasong-15 दोन मीटर जाड आहे ज्यामुळे अधिक इंधन वाहून नेण्याची क्षमता यामध्ये आहे.

गेल्या वर्षी अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात झालेल्या अणुकरारातील वाटाघाटी अयशस्वी झाल्यापासून हे प्रकरण तसेच राहिले आहे. किम जोंग उनच्या शस्त्रक्रियेबद्दलच्या वृत्तावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशा शुभेच्छा दिल्या होत्या. दुसरीकडे उत्तर आणि दक्षिण कोरियामधील तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या