किम जोंग उनने केली चीनची तारीफ, अमेरिका आश्चर्यचकीत

5087

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने कोरोनाच्या फैलावाला चीलनाच दोषी ठरवत आहेत. कोरोना व्हायरस असा शब्दही ट्रम्प उच्चारत नाही, ते याऐवजी चायनीय व्हायरस असा सातत्याने शब्द वापरतात. चीन हा अमेरिकेच्या निशाण्यावर असताना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने चीनची तारीफ केली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्याबद्दल किम जोंग उन याने चीनचे कौतुक केले आहे. अमेरिका चीनच्या विरोधात उभी ठाकणार असे वाटत असतानाच उत्तर कोरियाने स्पष्ट संकेत दिले आहे की ते चीनच्या पाठिशी उभे राहतील.

2020 या वर्षातला किम जोंग उन याने चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना पाठवलेला हा दुसरा संदेश आहे. पहिला संदेश किमने जानेवारीमध्ये पाठवला होता, ज्यामध्ये त्यांने कोरोनाविरोधातील लढाईत आपण चीनसोबत असल्याचे सांगितले होते. किमने पाठवलेल्या ताजा संदेश हा मौखिक असून त्यात त्याने म्हटलंय की तो शी जिनपिंग यांना चांगले आरोग्य लाभो अशी प्रार्थना करत आहे. शी जिनपिंग यांचा पक्ष मोठं यश मिळवत असून जिनपिंग हे त्यांच्या पक्षाचा सातत्याने विस्तार करत आहेत. जिनपिंग हे अत्यंत बुद्धीमान असून त्यांच्या नेतृत्वात चीन यश मिळवेलच.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याचा मृत्यू झाल्याच्या अफवा काही दिवसांपूर्वी उठल्या होत्या. त्यानंतर त्याचा ब्रेनडेड झाल्याचे वृत्त पसरले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्याच्या प्रकृतीची काही बातमी तुमच्याकडे आहे का? असे विचारले असता त्यांनीही सांगितले होते की ‘मला त्याची प्रकृती कशी आहे हे माहिती आहे, मात्र मी सांगणार नाही.’ यामुळे गोंधळात अजूनच भर पडली होती.

उत्तर कोरियाने याबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती प्रसिद्ध केली नव्हती. गेल्या शनिवारी सकाळी किम जोंग उनचे एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आणि किम हा धडधाकट असून तो पूर्णपणे बरा झाल्याचे या फोटोंमुळे जगाला कळाले. किम जोंग उनने एका खतांच्या कारखान्याचे उद्घाटन केले, त्यावेळच्या जाहीर कार्यक्रमातील हे फोटो होते. किम जोंग उन हा जवळपास 20 दिवसांनंतर जाहीर कार्यक्रमात दिसला होता. त्याला पाहताच लोकांनी मोठा जल्लोष केला असं KCNA नावाच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटलं होतं. किम पुन्हा कार्यक्रमात दिसल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं असता त्यांनी ‘मला यावर आत्ता काहीही बोलायचे नाही’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

KCNA ने दिली होती किमने खतांच्या कारखान्याचे उद्गाटन केल्याची बातमी
Korean Central News Agency (KCNA) ने दिलेल्या बातमीत म्हटलंय होतं की किमसोबत तिथले अनेक उच्च पदस्थ अधिकारी होते. त्याची बहीण किम यो उन ही देखील त्याच्यासोबत होती. किमने प्योंगयोंग भागातील एका खतांच्या कारखान्याची फित कापून त्याचे उद्घाटन केले. यानंतर कार्यक्रमाला हजर असलेल्या लोकांनी एकच जल्लोष केला. किम याने कारखान्याच्या उत्पादन यंत्रणेबाबत समाधान व्यक्त केले असून या कारखान्याचे देशाच्या प्रगतीमध्ये असलेल्या योगदानाबद्दल कौतुकही केले.

15 एप्रिलच्या कार्यक्रमानंतर किमच्या प्रकृतीबाबतच्या अफवांना सुरुवात झाली
15 एप्रिलला किमचे आजोबा किम II सुंग यांची जयंती असते. यादिवशी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि किम जोंग उन या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतो. तो कधीही हा कार्यक्रम चुकवत नाही. यावर्षी मात्र तो या कार्यक्रमात दिसला नव्हता. शिवाय त्याला काही दिवसांपासून तब्येतीचा त्रासही होत होता. यावरून तो अत्यवस्थ असल्याच्या बातम्या पसरायला सुरुवात झाली होती. अमेरिकेतील काही माध्यमांनी यानंतर बातम्या प्रसिद्ध केल्या की किम जोंग उनवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो मृत्यूच्या दारात उभा आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री माईक पॉम्पिओ यांनी विधान केलं होतं की अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनाही किम जोंग उन बऱ्याच दिवसांत दिसला नाहीये. त्यांच्या या विधानामुळे किमचं नक्कीच काहीतरी वाईट झालं असावं या चर्चेला आणखीनच बळ मिळालं.

ग्रेडींग व्यवस्थेनुसार देण्यात आलेल्या मार्कांबाबत जर एकादा विद्यार्थी असमाधानी असेल आणि त्याला वाटत असेल की त्याला कमी गुण मिळाले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याचा मार्क मोकळा असेल असेही सामंत यांनी सांगितले. या परीक्षा विद्यापीठांनी वेळापत्रक जाहीर करून घ्याव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. या गुण पद्धतीमध्ये एखादा विद्यार्थी नापास झाला तर त्यालाही पुढच्या वर्षीसाठी प्रवेश मिळेल मात्र ज्या विषयांत हे विद्यार्थी नापास झाले असतील त्या विषयाच्या परीक्षा त्यांना पुढच्या वर्षी द्याव्या लागतील. ज्या विद्यार्थ्यांना केटी लागली असेल त्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर 120 दिवसांच्या आत विद्यापीठांना परीक्षा घ्याव्या लागणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या