खासगी शौचालयासह फिरतो किम जोंग ऊन, कारण ऐकून थक्क व्हाल

आपली रहस्ये शत्रू राष्ट्रांना कळू नयेत यासाठी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन पूर्ण काळजी घेत असतो. याच काळजीपोटी तो स्वत:चा खासगी शौचालयही सोबत घेऊन फिरत असतो. आपली विष्ठा अज्ञात व्यक्तीच्या हाती पडली तर आपल्या तब्येतीबाबतची रहस्ये उघड होतील अशी भीती वाटत असल्याने किम जोंग उन असं करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. किमच्या या खासगी शौचालयाबाहेर कडक पहारा असतो. किमशिवाय या शौचालयाचा कोणीही वापर केल्यास त्याला जिवानीशी ठार मारण्यात येऊ शकतं असं डेली स्टारच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलं आहे.

किम जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याच्या ट्रेनमध्ये खासगी शौचालय असतेच शिवाय त्याच्या कारमध्येही शौचालय असते. पहाडी भागात किंवा बर्फाच्छादीत प्रदेशात फिरण्यासाठी असलेल्या किमच्या खास गाड्यांमध्येही शौचालय असल्याचे सांगण्यात आलं आहे. किमप्रमाणे इंग्लंडच्या राणीचेही खासगी शौचालय असते. त्यातील पेपर रोल, नॅपकीन यांच्यावर विशिष्ट स्टीकर असतात आणि ते सील केलेले असतात. राणीशिवाय या गोष्टी कोणीही वापरू शकत नाही.त्याचप्रमाणे प्रिन्स चार्ल्स जेव्हा मित्राच्या घरी राहायला गेला होता तेव्हा स्वत:च्या गाद्या, टॉयलेट सीट, पुसण्यासाठी वापरायला वेल्वेटचे रोल सोबत घेऊन गेला होता.